top of page
  • bilorijournal

अंक १, संपादकीय / Issue 1, Editorial

The word ‘bilori’ means crystal glass, but more than that it means the play of light refracted through the crystal glass. The play of light through ‘bilori’ creates visual and conceptual imagery of things being here and there, here and nowhere, and a feeling of curious questioning and comfortable uncertainty.


If the journal has one defining characteristic, it is that it is comfortable with the absence of an authoritative voice. It is okay with being wrong and standing corrected. It conducts its postcoloniality as an entity persevering to travel through and among spectrums, sometimes failing to but at all times conscious of and trying to break the chains of binary thought. It is a space for learning, unlearning and learning afresh.


We are grateful to present to you Issue 1. It is the fruit of the free spaces of time that our volunteers (editors, translators, designers, and copy editors) seized, between college classes, assignments, projects, errands, full-time jobs, PhD applications and the tiresome hustle of trying to lead a life of ethics in a world that cares about monetary profits, end-products, and SEO statistics.


Issue 1 exists because of the writers/researchers who were kind enough to trust us with their work. Mohini Pitke expresses her thoughts about how a poem ought to be experienced for the reader to be able to enjoy its complete essence; Vivek Gokhale contemplates the rules of ‘criticism’ mandatory for any researcher who wishes to analyse an artform; Asmaani Kumar takes us through the wonderfully subversive world of Bhajju Shyam’s The London Jungle Book; Ankit Kawade analyses the modern Dalit identity through Yogiraj Waghmare’s Begad; Maithili Phatak undertakes a semiotic analysis of Sadaat Hasan Manto’s Toba Tek Singh.


We have tried to treat each translation as not just a version of its original, but an independent text into itself, deserving criticism of its own. This is our attempt at creating research-based content online for the Marathi reader as well as a platform for Marathi literary researchers to express their ideas. The work of pre-existing publications such as Hakara Journal, Miloon Saryajani, Tara Books and Zubaan Books was a huge inspiration for us.


Working on this journal has been a source of catharsis for us in many ways. It has helped us make sense of and explore further into who we are as bilingual/multilingual decoloniszing individuals.

If you like Issue 1, we invite you to become part of our team and community. You can apply to volunteer with us here.

We welcome our community of readers and writers to share their constructive feedback at bilorijournal@gmail.com.


Kimaya Kulkarni

Editor-in-Chief

***


मराठी अत्यंत समृध्द भाषा आहे यात काही शंकाच नाही. परंतु इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे आपली मराठी भाषा आणि इतर प्रादेशिक, आदिवासी भाषांचा ऱ्हास होत चालला आहे. मराठी बोलणारे ह्या नात्याने आपल्यावर भाषा जपायची जबाबदारी आहे.

माझं मराठीवर खूप प्रेम असूनही मला साधे साधे शब्द आठवायला त्रास होतो. इंग्रजी शब्द सुचतात. रोजच्या आयुष्यातले अनुभव इंग्रजी भाषेमध्ये जास्त चांगल्या प्रकारे वर्णिले जाऊ शकतात असा विचार करण्याकडे माझाही कल आहे. मला परदेशी, पाश्चात्य साहित्य आणि कलांबद्दल जास्त माहिती आहे याचीही मला लाज वाटते. आपल्या भाषेमध्ये केलेलं थोर काम, लिहिलेल्या कथा, कविता, नाटकं याचा आपण अभ्यास नाही केला तर कोण करणार?

बिलोरीचं काम मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं त्याला तीन कारणं आहेत. एक, प्रादेशिक भाषांमध्ये ज्ञानाची निर्मिती सतत होत राहिली तरंच त्या भाषा जिवंत राहतील. दोन, माझ्या पिढीच्या लोकांमध्ये ‘intellectual, critical' संवाद मराठीमध्ये होत नाहीत. इंग्रजी अधिक सोयीची वाटते. मराठीमध्ये अश्या चर्चांना प्रोत्साहन देणारं बिलोरी जर्नल हे एक व्यासपीठ आहे. आणि तीन, माझ्यापासून दूर चाललेल्या मराठीमागे वेड्यासारखं धावताना माझ्यातली मराठी भाषा मुठीत घट्ट धरून ठेवण्याचा हा माझा अप्पलपोटी प्रयत्न आहे.


मोहिनी पिटकेंच्या आणि विवेक गोखलेंच्या लेखांत त्यांचं मराठीवर असणारं प्रेम उघडपणे दिसतं. मोहिनीताईंना पाठ असणाऱ्या कविता सहज आल्या तशा त्यांनी लेखात वापरल्या. विवेकदादांच्या लेखात मीमांसेबद्दल जे इंग्रजीमध्ये वाचलं होतं ते पहिल्यांदा मराठीमध्ये वाचण्याची संधी मिळाली. अंकितची ‘बेगड‘ पुस्तकाची मीमांसा सध्याच्या मराठी समाजासाठी खूप गरजेची आहे. आसमानीच्या भज्जू श्याम ह्या गोंड कलाकाराच्या पुस्तकाच्या विश्लेषणातून कला आणि कलाकार हे साहित्य आणि लेखकांइतकेच महत्त्वाचे असतात ह्या कल्पनेला पुष्टी मिळते.

बिलोरीच्या पहिल्या अंकाच्या संपादनातून मला बरंच काही शिकायला मिळालं. तुम्हालाही वाचक म्हणून तेवढाच आनंद मिळेल अशी माझी आशा आहे.

आपण आपली भाषा वाढवली नाही तर ती वाढणार नाही.


सुरभी अर्जुनवाडकर

सहसंपादक


***


This first issue of Bilori Journal is close to my heart for obvious reasons. Working on it has been so refreshing, especially since the journal started at a time when everything around us had been at a standstill for months. This is also the first time I took up the role of editor, and it's been exciting to have read and edited such impressive essays.


When we began working on our first issue, we thought we knew exactly what we were looking for- essays and articles on lesser known, marginalized works of literature. But we realized soon enough how difficult it is to ascertain works of literature as 'marginalized' or 'mainstream'. What is mainstream for students and lovers of literature may not necessarily be so for everyone else. There is also the fact that what is lesser known may not necessarily be marginalized. We realized how our understanding of the mainstream and marginalized would need to be contextualized for every submission that we received. This has been a question that we've had to grapple with at every step of the editorial process.


Maithili's essay is an incisive analysis of Manto's (mostly) well known story. The author's semiotic approach to the text successfully brings out the senselessness of the Partition of India that Manto depicted through the experiences of the lunatics in Lahore's mental asylum. This particular essay introduces a lot of ideas and probes one to see Manto's writing from a much deeper perspective.


Ankit Kawade's piece titled A Return To Homelessness is about Yogiraj Waghmare's short story 'Begad', and it intersperses commentary about the text along with astute observations about the Dalit individual's identity in the continually shifting modern world. For me, Ankit's piece is exactly the kind of writing that we are eager to publish in our journal. Regional literature is rarely ever read or discussed by those in the 'mainstream'; and that is why this essay on Begad, a short story written in Marathi, is such an important addition for our first issue.


We made a conscious decision to not restrict ourselves by introducing a particular theme for the first issue of Bilori, and this has allowed us to bring forth an eclectic collection of essays, all of which have, in turn, helped us realize our vision better. I sincerely hope that you, dearest reader, enjoy this issue as much as we did while putting it all together.


Sanjukta Bose

Associate Editor


***

Translation at its core is an attempt to understand the Other, those seemingly different from us. It creates a much needed space for meaningful communication between two languages, between two worlds. Once you understand how a certain language expresses meaning, you begin to understand people speaking it. This starts a conversation. When we learn the nuances of another language, we start to see the realities of those speaking it. At this moment in history, it is very important for all of us to have this conversation with those who live, think and perceive things differently than us.

I find translation fascinating because in the process you need to distinguish between meaning of the concepts and the words embodying those meanings. Only through translation can you see how a certain concept has different flavours in different languages. Seeing these differences makes you realise to what extent our thoughts are shaped by the language we speak. To add to the nuance, each language has a style that’s unique to it. For example, In Marathi, an argument is repeated a few times with slight variations to emphasise that argument or a point. English on the other hand, avoids repetition. So, translation has to create a space where a concept, enriched by unique nuances of one language, retains its value in the other one. In order to do this, one must know socio-cultural context and history of a language alongside grammar.

Hierarchical relationships enter the picture whenever it comes to translation between English and an indigenous language. The goal here is to simultaneously make celebrated works in English language to native non-English speakers and visibilize and highlight the already existing wealth of knowledge in Marathi language while acknowledging the existing hierarchy that colonial and post-colonial relations have created between these languages.

In this issue I translated articles by Mohini Pitke and Vivek Gokhale, both quite intriguing and concept heavy. Finding counterparts for specific theoretical terms lead me to many interesting readings on the topics of Ethics, Aesthetics and Poetry; and I am very grateful for that.


Saee Pawar

Translator and Translation Editor

***

अनुवाद करण्याची माझी ही पहिलीच वेळ. भाषेचे सामर्थ्य नक्की काय असते हे ‘बिलोरी जर्नल’साठी अनुवाद करायला मिळालेले लेख वाचताना जाणवले. वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले लेख वाचताना नवीन माहिती तर मिळालीच पण वेगवेगळ्या लेखकांचे दृष्टीकोनही बघायला मिळाले. नव्या-जुन्या पुस्तकांशी ओळख झाली. ‘बिलोरी’च्या पहिल्या अंकासाठी लेखन मिळवण्याच्या निमित्ताने बऱ्याच लोकांशी बोलायची संधी मिळाली. अंक तयार करताना प्रत्येक टप्प्यावर संवाद आणि त्यातातूनच भाषेचे आपल्या आयुष्यात असलेले अस्तित्व वेगळ्या नजरेने बघता आले.

साहित्य आणि कलेत विचार करायला लावण्याची केवढी शक्ती आहे हे, हे काम करताना जाणवले. इंग्रजी आणि मराठी ह्या दोन्ही भाषा किती समृद्ध आहेत हे नव्याने शिकायला मिळाले. अनुवाद करता येणे ही एक कला आहे. मूळ भाषेचे सौंदर्य न घालवता, तिची वैशिष्ट्ये लक्षात घेऊन, तितक्याच भावनात्मकतेने अनुवादित लेखन समोर येणे हे अनुवाद्कर्त्याचे खरे कसब आहे. हा हेतू साधण्यासाठी एक मेंदू मराठीत आणि एक इंग्रजीत असे जणू दोन मेंदूच मी कामाला लावले होते! जुन्या काळात, जेव्हा अनुवादाची कला निर्माण होत होती तेव्हा सुरुवातीच्या अनुवादकांना काय वाटले असेल हा विचार मनात आला. संपूर्ण संस्कृतींना, समाजांना ज्या कलेचे, साहित्याचे अस्तित्वच माहिती नव्हते त्या लोकांना ह्या अनुवादकांच्या कामामुळे एक नवीन जगच अनुभवायला मिळाले. शतकानुशतके घडणाऱ्या ह्या कार्याचा आपण छोटासा भाग झालो आहोत ह्याचे मला विलक्षण समाधान वाटले.

मैथिली फाटकने लिहिलेला ‘टोबा टेक सिंह’ ह्या लघुकथेवरच्या लेखाचा मराठी अनुवाद करताना, मूळ कथेतला क्लेश आणि त्या क्लेशाचा शोध दोन्ही मला मनापासून आवडले. सुरुवातीला ‘चिन्हवैज्ञानिक दृष्टीकोन’ म्हणजे काय हे मला माहिती नव्हते पण त्याचा अर्थ समजावून घेण्याची एक छान सुरुवात ह्या लेखामार्फत झाली! मी मुळात पशुवैद्यक असून समोर आलेल्या प्राण्याकडे बघून वेगवेगळ्या लक्षणांमधून त्याला समजून घ्यायचे आमचे काम आहे. मैथिलीच्या लेखातून ‘टोबा टेक सिंह’कडे बघण्याचा असाच एक प्रयत्न मला जाणवला. आसमानी कुमारच्या ‘द लंडन जंगल बुक’ ह्या पुस्तकावरच्या लेखाने मला एका नवीन प्रकारच्या कथाकथनाचे दर्शन घडवले. ह्या लेखाने मला अश्या लिखाणाचे महत्व आणि गरज पटवून दिले. लोककलेची कथाकथनाची क्षमता सोधारण दाखवून, माझ्या मनात भज्जू श्याम ह्यांच्या पुस्तकाबद्दल विलक्षण कुतूहल निर्माण केले.

लहानपणापसून नित्यनियमाने सोडवलेल्या शब्द्कोड्यांचा असा फायदा होईल असे कधी वाटले नव्हते. भारताबाहेर राहत असल्यामुळे मराठीशी असलेले नाते जरा सैल पडले होते ते ह्या निमित्ताने पुन्हा एकदा घट्ट झाले. जेवढा आनंद मला अनुवाद करताना मिळाला तेवढाच आनंद वाचकांना ‘बिलोरी जर्नल’ मधले लेख वाचताना मिळावा हीच मनोकामना!

आर्यायशोदा कुलकर्णी

अनुवादक


***

दलित साहित्याशी नकळतच झालेली माझी पहिली ओळख म्हणजे नरेंद्र जाधवांच्या 'आमचा बाप आन आम्ही' कादंबरीचे आमच्या लहानपणी रेडिओवरून पहाटेच्या वेळी प्रसारित होणारे मी ऐकलेले अभिवाचन. मी तेव्हा फारच लहान होते आणि त्यातले काही संदर्भ किंवा ती एक दलित कथा आहे हे मला समजत नसे. पण तरीसुद्धा ते अभिवाचन गुंगवून ठेवणारे असल्याची एक अंधुक आठवण आहे. पुढे मी वाचू लागल्यावर माझ्या वाचनाचा कल जाहिरातकलेशी संबंधित असणाऱ्या विषयांकडे, आणि एकूणच त्या क्षेत्रातील माझे त्यावेळचे मित्रमैत्रिणी/ सहकारी जे सुचवतील ते वाचण्याकडे असल्याने दलित साहित्य फारसे वाचण्यात आले नाही. पण अलीकडेच मी सुषमा देशपांडे यांनी घेतलेली दलित लेखिका उर्मिला पवार यांची मुलाखत पाहिल्यावर त्यांची 'आयदान' ही कादंबरी वाचली आणि त्या अनुभवाने भारावून जाऊन मी अधिकाधिक दलित साहित्य वाचण्याचे ठरवले आहे.

सर्वसामान्यपणे इतर जातीय समाजात दलितांसाठी 'बौद्ध' हे संबोधन काहीशा कुत्सितपणे वापरले जात असल्याचे माझ्या अनेकदा पाहण्यात आले आहे. तर दुसरीकडे ‘इंस्टाग्राम’सारख्या समाजमाध्यमांवर मी, दलित किंवा दलित नसलेल्याही नवतरुणांना 'ब्लॅक लाईव्हज मॅटर'च्या धर्तीवर 'दलित लाईव्हज मॅटर' ही चळवळ नेटाने चालवताना पाहते आहे. दलितांवर आजही होणारे अत्याचार, किंवा दलित ही आपली ओळख न पुसता आपल्या व्यक्तिमत्वाला जागतिक पातळीवर ओळखले जातील असे पैलू पाडणारे युवक-युवती यांच्याबद्दल वाचले की मन निराशा आणि आशा या दोन्हींनी भरून येते. मग जाणवते की खरे समाजभान या दोन्ही गोष्टी पुढे पाठवण्यात आहे.

'परतीची वाट बेघरपणाकडे?' हा लेख मी भाषांतरित करायला घेतला तेव्हा मला काहीसे सुखद वाटले. त्याचे कारण हे की आपण उपेक्षितांनी लिहिलेली एखादी कथाच फक्त भाषांतरित करत नसून त्याहीपुढे जाऊन त्याचे एक तुलनात्मक विश्लेषण भाषांतरित करत आहोत, हे होते. हे विश्लेषण वाचल्यावर नव्याने दलित साहित्य वाचणाऱ्यांना नेमके काय वाचावे आणि त्यातून काय बोध घ्यावा या दिशेने एक मार्ग सापडू शकतो ही एक भावना होती.

भाषांतर करत असताना वर सांगितल्याप्रमाणे मी वाचलेले थोडेबहुत दलित साहित्य मला आठवलेच. मी प्रेरणा मात्र मी लहानपणी ऐकलेल्या त्या रेडिओवरच्या अभिवाचनातून घेतली. ते जसे सुगम, सोपे, संभाषणात्मक होते तसेच स्वरूप मी या लेखाच्या मराठी रुपाला देण्याचा प्रयत्न केला. या विश्लेषणात जेव्हा मूळ कथेतल्या पात्रांच्या भावभावनांची वर्णने येतात, तेव्हा ती जास्तीत जास्त जिवंत, ओळखीची वाटावीत ही काळजी घेतली. तर जो विश्लेषणात्मक भाग आहे तो क्लिष्ट न करता तो आपण एखाद्याला समजावून सांगत आहोत असा लिहिला. शिवाय, मी 'बेगड' ही कथा शाळेतल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात वाचल्याचे मला आठवले. पण आज त्याच्या इंग्रजी विश्लेषणाचे मराठी भाषांतर करताना ती कथा मला नव्याने भेटली, नव्याने समजली असे वाटले. मूळ इंग्रजी विश्लेषणाचे हे भाषांतर वाचून उपेक्षितांचे साहित्य वाचण्याची प्रेरणा नवतरुणांना आणि खरे तर सगळ्यांनाच मिळावी. त्यातून जाणिवांच्या, नेणिवांच्या नव्या लाटा येतील आणि त्या किनाऱ्यावर बसून तटस्थपणे पाहायच्या की त्यांत डुंबायचे, त्यांवर आरूढ व्हायचे हा कौल तुमचा आहे.

अन्योक्ती वाडेकर

अनुवादक


***


As a copy editor, I hope that my work is seamlessly blended with that of the author. I believe that it is the copy editor’s job to preserve the words of the writer in every way possible, while also always ensuring that the work is both clear and correct.


For this issue of Bilori Journal, copy editing proved to be an easy task as our authors had crafted excellent essays. However, wherever needed, I tried to think of myself in the reader’s position and asked myself: Does this make sense? Do I understand the context? And always, is this grammatically correct? If I could answer all of those questions with a resounding “yes”, then I knew that my work was done.


More personally, it has been such a privilege to copy edit so many essays on texts I have not read. My eyes have been opened to even more wonderful works of literature. My to-be-read list grows daily as I am inspired by all the work submitted to Bilori. I hope you all enjoy reading this issue as much as I have enjoyed working on it!


Anna Jurek

Copy and Research Editor


***

When I first got onboard Bilori Journal as a copy editor, I had little to no idea about the way my creative life was to change.

The task of copy editing pieces is to ensure the sanctity of the author’s ideas as well as the clarity of the expressions and words used. Copy editing for the launch issue of Bilori Journal was a wholesome experience. The spirited essays honestly needed only a little trimming to hammer home their essence.

My task was made easier with the efforts put in by the authors and the editors. Reading the essays allowed me to think and engage deeper with the texts in ways I never had the chance to previously.

I hope that you find this issue of Bilori Journal as engaging and fun as we did. Here’s to the first issue, and to many more.

Sona Srivastava

Copy and Research Editor

***


bottom of page