Bilori Journal is now four-issues old, and we're grateful that in this era where most things remain relevant only for a little longer than a TikTok video, we've managed to thrive and grow and keep our readers interested in writings on lesser known works of literature. Or so we'd like to hope. What makes Bilori Journal even more special is the fact that it is created by a team that works, not out of a late-capitalist hunger for a successful side hustle, but simply because we derive great pleasure from critically engaging with literature in all its forms. As always, I'm thankful to all those writers who consider our journal to be a worthy enough home for their writing. We're nothing without their faith in our publication and editing skills.
This time we have quite an eclectic spread to offer our readers—an insightful interview with translator Gorakh Thorat on the ins and outs of translation; an essay by Jayasri Sridhar that offers a comparative analysis of the female characters in two historical fiction novels; a personal essay by Elisse Kennan where the author races to trace the boundaries between fiction and reality only to realize there probably isn't one; and a refreshingly original ecofeminist reading of a notable Sunil Gangopadhyay text by Sakshi Nadkarni.
Each piece in this issue has forced us to expand our understanding of literature and the world around us, taking us through dense forests and mythical times. As we bring this issue out into the world, we hope our readers experience the same magic.
Sanjukta Bose
Associate Editor, Bilori Journal
बिलोरी जर्नलच्या ४थ्या अंकात ‘अनुवादकांची मुलाखत’ ह्या सदरामधे हिंदी-मराठी अनुवाद करणारे गोरख थोरात ह्यांच्याशी गप्पा मारायची संधी मिळाली. त्यांनी सांगितलेले अनुवाद करताना येणारे अनेक अनुभव तसेच मूळ विषयाची मजा, एका भाषेतून दुसर्या भाषेत नेताना करावे लागणारे प्रयत्न, ऐकताना, एखाद्या अनुवादकाच्या नजरेतून अनुवाद करत असलेले लिखाण कसे दिसते ह्याची झलक मिळाली.
जयश्री श्रीधरने लिहिलेल्या ‘तलवारी, ताकद आणि तबाही’ ह्या लेखात तिने स्त्रीपात्रांचे स्थान आणि लेखन ह्याबद्दल दोन लेखकांच्या शैलीची तुलना केली आहे आणि ते वाचताना ओळखीच्या पात्रांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची संधी मला मिळाली. एखाद्या अवघड प्रसंगातून होणारा मानसिक आघात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी घ्यावे लागणारे निर्णय ह्यांचा एलिस केनन हिने स्वत:च्या अनुभवातून ‘ऐछिक’ ह्या लेखात आढावा घेतला आहे. आपले मानसिक स्वास्थ्य जपणे ही प्रत्येकाने ठरवून करण्याची गोष्ट आहे हे लेख वाचताना मला जाणवले. साक्षी नाडकर्णी ने लिहिलेल्या ‘स्त्रीसाठीचा समानार्थी शब्द म्हणजे अरण्य’ ह्या लेखातून ‘ईकोफेमीनिझम’ ही संकल्पना मला नव्याने कळली. निसर्ग आणि स्त्री ह्यांच्यातले नाते आणि त्या दोन्हीवर केली जाणारी कुरघोडी एका कथेच्या संदर्भातून वाचताना मला जास्त सहजपणे लक्षात आली.
ह्या अंकात नवीन विषय आणि उत्कट लिखाण असे दोन्ही आहे. अनुवादक म्हणून हा अंक तुमच्यापुढे प्रस्तुत करताना नवीन काहीतरी वाचल्याचा जो आनंद मला मिळाला तोच आनंद तुम्हालाही मिळो हीच इच्छा!
आर्यायशोदा कुलकर्णी
अनुवादक, बिलोरी जर्नल
Comments